शुक्रवार, २० जुलै, २०१२

काय आहे आय पी ऍड्रेस

महाराष्ट्र टाईम्स
Link - http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-4955942,prtpage-1.cms

आयपी ऍड्रेस हळूहळू ई मेल ऍड्रेसप्रमाणेच रोजच्या वापरायचा शब्द बनणार आहे.



तुम्ही कम्प्युटरशी संबंधित काम करत असाल तर आपण नक्कीच कधीतरी आय पी ऍड्रेस हा शब्द ऐकला असेल. पण आपण त्या शब्दाकडे तितक्या उत्सुकतेने लक्ष दिलं नसेल. कारण याची नेहमी कम्प्युटरवर काम गरज असणार? पण जवळपास सर्वच ऑॅफिसमधील कम्प्युटर हार्डवेअर इंजीनिअर्स याचा वापर नेटवकिर्ंगसाठी करतात. त्यामुळे आता हा शब्द थोडा रुळू लागलाय. हळूहळू आय पी अॅड्रेस् देखिल ई-मेल ऍड्रेसप्रमाणे रोजच्या कामाच्या वापरामध्ये येईल.


आय पी ऍड्रेसचा फूलफॉर्म Internet Protocol Address असा आहे. हा एक प्रकारचा क्रमांक असतो जो नेटवकिर्ंग अथवा इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेल्या प्रत्येक कम्प्युटरच्या जागेची माहिती देतो. ज्याप्रकारे आपणास टेलिफोन किंवा मोबाइल नंबरमधून तो कुठला म्हणजेच कुठल्या ठिकाणचा असेल, हे कळते त्याच प्रकारे आय पी ऍड्रेस द्वारे एखादा कम्प्युटर कुठे आहे हे सांगता येते.

आय पी ऍड्रेस प्रामुख्याने तीन प्रकारांमध्ये विभागलेला आहे. यांना क्लास असे म्हणतात. उदाहरणार्थ क्लास ए,बी किंवा सी. क्लास एमध्ये १६ दशलक्ष नेटवर्क समूह असतात. प्रत्येकी १२६ नेटवर्क जोडलेले असतात. क्लास बीमध्ये ६५ हजार नेटवर्क असतात ज्यामध्ये प्रत्येकी १६ हजार जोडलेले असतात. तर सीमध्ये फक्त २५६ नेटवर्क समूह असतात. त्यात प्रत्येकी दोन दशलक्ष नेटवर्क जोडलेले असतात. प्रत्येक नेटवर्कमध्ये अनेक कम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात. सी लहान नेटवकिर्ंग समूहासाठी असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात जवळ-जवळ सर्वच ठिकाणी या प्रकारातील प्रणाली वापरली जाते.


सध्या आपण जी आय पी अॅड्रेस् प्रणाली वापरतो ती त्याची चौथी आवृत्ती (IPv4) सध्या जास्तीत जास्त प्रचलित आहे. Internet Assigned Numbers Authority (IANA) ही संस्था जगभरातील आय पी अॅड्रेसच्या जागेचे आयोजन करते. ही संस्था Regional Internet Registries (RIRs) अशा जगभरातील पाच संस्थच्या मदतीने जगभरातील सर्वच ठिकाणच्या स्थानिक इंटरनेटसेवा देणाऱ्या कंपन्यांना आय पी अॅड्रेस् देण्याचे काम करते.

स्टॅटिक आणि डायनॅमिक आय पी ऍड्रेस असे दोन भाग आहेत. स्टॅटिक अॅड्रेस बदलत नाही आणि जो कम्प्युटर अॅडमिनिस्ट्रेटरकडून दिला जातो. एखाद्या वेबसाइटचे नाव आणि जागा म्हणजेच डोमेन नेममध्ये स्टॅटिक आय पी ऍड्रेस असतो. म्हणजेच www.rediff.com या वेबसाइटच्या नावातला आय पी अड्रेस् हा त्या वेबसाइटच्या जागेशी संबंधित असतो. अशाप्रकारे सर्व वेबसाइटस आय पी अॅड्रेसद्वारे जोडलेल्या असतात. सध्या अनेक वेबसाइटच्या नावांसाठी 'virtual IP address (VIPA)' वापरला जातो.

आय पी ऍड्रेस मधील संख्या चार भागांमध्ये विभागलेल्या असतात. (उदा. xxx . xxx . xxx . xxx) या संख्या तीन अंकांनी 0 (शून्य) ते २५५ पर्यंत दर्शविलेल्या असतात. उदा. १९२.१६८.१.१ किंवा ११४.१४३.२४२.१७१ . तर या तीन च्या संख्येने असलेल्या चार भागांमध्ये टिंब दिलेले असतात.

आपल्या कम्प्युटरवर जर इंटरनेट असेल तर www.whatismyipaddress.com या वेबसाइटवर आपण आपल्य कम्प्युटरचा आय पी अॅड्रेस् पाहू शकता. याच वेबसाइटवर आपण कुठल्या शहरामध्ये इंटरनेट वापरत आहात हे दाखवले जाते.

सायबर सेल या इंटरनेटवरील गुन्हे शोधणाऱ्या पोलिसांना इंटरनेटच्या माध्यमातून केलेल्या गुन्हांना शोधण्यासाठी आय पी अॅड्रेसचाच उपयोग होतो. परंतू आय पी अॅड्रेसच्या चौकटीतून पळण्यासाठी सध्याचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत असलेले सायबर गुन्हेगारही गुन्हा करताना आपला आय पी ऍड्रेस लपवून गुन्हा करतात. गुन्हा केल्यानंतर त्यांचा आय पी अॅड्रेस् सापडणे मुश्किल होते. तर बऱ्याच वेळेस असे गुन्हेगार आपल्या कम्प्युटरचा आय पी अॅॅड्रेस् बदलून दुसऱ्याच खोट्या आय पी ऍड्रेस ने गुन्हा करुन सायबर क्राइम सेलची पंचाईत करतात.


बऱ्याच वेळेस पोलिसांना धमकीचे ई-मेल पाठविल्याच्या तक्रार येतात अशावेळेस तो ई-मेल पाठविणाऱ्याला शोधण्याासाठी ई-मेलच्या हेडरमध्ये असलेल्या आय पी ऍड्रेस वरुन तो ई-मेल ट्रेस करुन तो कुठून पाठविला असेल याचा शोध घेतला जातो.

0 टिप्पणी(ण्या):