महाराष्ट्र टाईम्स Link - http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-5065971,prtpage-1.cms
आपला ई-मेल उघडत नसेल तर माझा ई-मेल हॅक झाला असावा बहूतेक असं बऱ्याच लोकांना वाटू लागते. आपण आपला ई-मेल आणि पासवर्ड व्यवस्थित टाइप केलेला असतो पण तरीही ई-मेल खातं उघडत नाही मग काय प्रॉब्लेम आसवा तर नक्कीच तो कुणीतरी हॅक केला असवा. कारण या व्यतिरीक्त इतर दुसरं कुठलंचकारण असूच शकत नाही. सध्या अशा ती बऱ्याच ऐकायला मिळतात. मग ज्याचा ई-मेल (त्याच्या मते) हॅक झालेला असतो, त्याला तो ई-मेल भविष्यात विसरून नवीन ई-मेल खातं उघडण्याशिवाय इतर काही पर्याय नसतो. मग त्या आपल्या (हॅक झालेल्या)/ ई-मेल खात्यातील सर्व महत्त्वाच्या ई-मेल्सवर पाणी सोडावं लागतं. कारण नंतर आपला ई-मेल (हॅक झाल्याने) भविष्यामध्ये आपल्याला कधीच मिळणार नाही, अशी त्यांना खात्री होते.
परंतू प्रत्यक्षात आपला ई-मेल इतर दुसऱ्या काही कारणामुळे बंद झाला असावा का, असा विचारही बरेच लोक करत नाहीत आणि त्यामूळे आपल्या बंद झालेल्या ई-मेलवर काही इलाज असू शकत नाही असा ठाम विचार केल्याने ती लोक आपलेच नुकसान करीत असतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला ई-मेल अॅक्सेस होत नाही म्हणजे तो हॅक झाला, असा विचार करणं चुकीचं आहे. एखादा ई-मेल न चालण्याची बरीच कारणं असू शकतात जी प्रथम पडताळणं आवश्यक असतात कारण अशाच कारणामुळे आपला ई-मेल खरंच बंद पडला आहे का ते आपल्याला कळेल.
१ बऱ्याच वेळेस आपले एकापेक्षा जास्त ई-मेल असतात तर त्याचे पासवर्ड निरनिराळे असल्याने आपण आपल्या दुसऱ्याच एका ई-मेलचा पासवर्ड आपल्या निराळ्या ई-मेलसाठी वापरतो आणि पर्यायाने तो चालत नाही. त्यामुळे शक्यतो आपल्या इतर ई-मेलसाठी सारखाच पासवर्ड वापरावा.
२ बराच काळ आपण आपला एखादा ई-मेल न वापरल्यास आपण त्याची स्पेलिंग विसरण्याची शक्यता असते अशावेळेस आपल्याला आपला पासवर्ड आठवत असतो पण/ ई-मेलचा यूझर आयडीच व्यवस्थित न दिल्याने आपला ई-मेल चालत नाही.
३ काही लोकांना आपले अनेक ई-मेल वापरण्याची सवय असते तर ते सुरक्षिततेसाठी आपल्या प्रत्येक ई-मेलला निरनिराळा पासवर्ड देतात मग काहीवेळेस ते आपल्या एका ई-मेलचा पासवर्ड चुकून दुसरा ई-मेल उघडताना देतात. सहाजिकच तो न चालल्याने मग ते तोच पासवर्ड परत-परत टाईप करतात. अशाप्रकारे चुकीचा पासवर्ड सारखा दिल्याने तो ई-मेल उघडत तर नाहीच पण बऱ्याच वेळेस तो सुरक्षिततेसाठी र्सव्हरमुळे ब्लॉक होण्याची शक्यता असते. असा ब्लॉक झालेला ई-मेल मग पुन्हा मिळवताना आपल्याला मग आपणच दिलेल्या गुपित प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं ते दिल्यानंतरच मग आपण पुन्हा आपला ई-मेल उघडू शकतो.
४ कम्प्युटरशी जराही संबंध नसलेले बरेच लोक उगाच बऱ्याच वेळेस दुसऱ्याच्या मदतीने आपला नवीन ई-मेल तयार करून घेतात. पण तो ई-मेल उघडायचा कसा आणि त्यातील आपले ई-मेल पाहायचे कसे, याचे त्यांना पुरेसे ज्ञान नसल्याने एकट्याने आपले ई-मेल खाते उघडताना बऱ्याच चुका केल्याने त्यांना त्यांचा ई-मेल उघडता येत नाही. त्यामुळे मग आपला ई-मेल हॅक झाला असावा, अशी शंका त्यांना येते.
माझा ई-मेल हॅक झाला असावा! अशी खात्री झाली असली तरी खाली दिलेल्या काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे.
१ आपला ई-मेल हॅक कोण आणि कशासाठी करेल?
२ आपला ई-मेल करून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा काय फायदा होईल, जास्तीत जास्त तो आपल्या नावाने कुणालातरी खोटे पत्र पाठवेल. पण नंतर त्याचा खुलासा होईलच. प्रत्यक्षात इंटरनेटवर दुसऱ्याच्या नावाने तिसऱ्याला ई-मेल पाठवण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. (त्यांची इथे माहिती देता येणार नाही, नाहीतर तुम्हीच कुणालातरी दुसर्?याच्या नावाने खोटा ई-मेल पाठवाल.
ई-मेल हॅक करणे सोप्पी गोष्ट नाही, तसेच ज्याला ई-मेल हॅक करता येतो तशी व्यक्ती खरंच आपल्या आसपास आहे का हे पहावे.
आपला ई-मेल चालत नाही म्हणजे तो नक्कीच हॅक झाला असावा याची शक्यता लाखो ई-मेल मध्ये एक एवढी आहे. त्यामूळे आपला ई-मेल चालत नसल्यास यापैकी कुठला पर्याय त्याला लागू होतो ते पाहावं.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा