शुक्रवार, २० जुलै, २०१२

लॅपटॉप घेताय!

महाराष्ट्र टाईम्स Link - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5165965.cms

लॅपटॉप घेताना काही गोष्टी आपल्यालाच माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळेच लॅपटॉप घेण्यापूवीर् काही गोष्टी जाणून घ्या.

.......
काही वर्षांपूवीर् आपल्या घरी कम्प्युटर असावा, असा विचार करणारी मंडळी आता आपल्या घरी लॅपटॉप असावा असा विचार करू लागली आहेत. सोनं अथवा कपडे घेताना आपण इतर कुणाकडे जास्त चौकशी करत नाही, पण कम्प्युटर अथवा लॅपटॉप घ्यायचा म्हटला तर महिन्याभरापासूनच बऱ्याच लोकांकडे त्याबद्दलची चौकशी सुरू होते. कुठून, कसा घ्यावा? काय किंमत असेल? कुठला चांगला? गॅरंटी किती वर्षांची आहे? आदी. कारण एकदा का कम्प्युटर अथवा लॅपटॉप घेतला की नंतर काही त्रास व्हायला नको. हे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला असं वाटतं की एकदा विकत घेतल्यानंतर तो व्यवस्थित चालायला हवा.

जर चांगला लॅपटॉप विकत घेणार असाल काही गोष्टी लक्षात घ्या


* एखाद्या विशिष्ट कंपनीचा लॅपटॉप विकत घ्यायचं ठरवलं अन्य लॅपटॉपच्या हार्ड-डिस्क, रॅम, प्रोसेसर यांची तुलना करून घ्यावी, ज्यामुळे त्यामध्ये अद्ययावत कुठला ते कळेल.

* लॅपटॉप शक्यतो हाताळायला भक्कम आणि जास्त वजनदार नसावा.
* लॅपटॉप की-बोर्ड बदलता येत नसल्याने आरामदायक, सहज दाबली जाणारी असावीत.
* लॅपटॉपची बॅटरी हा महत्त्वाचा भाग. जास्त वेळ चालणारी बॅटरी असलेला लॅपटॉप प्रवासामध्ये काम करताना फार उपयोगी पडतो.
* लॅपटॉप अंतर्गत स्पीकर्सची सोय असते यामध्ये सध्या डॉल्बी-डिजीटल असलेल्या लॅपटॉपमध्ये गाणी ऐकण्याचा आनंद निराळाच असतो.
* सध्या कमी किमतीतील लॅपटॉपमध्येही वेबकॅमची सोय असते. अशा लॅपटॉप चॅटिंग करताना त्या कॅमेऱ्याचा फायदा होतो.
* लॅपटॉपच्या की-बोर्डलाच जोडलेला माऊस म्हणजे टचपॅड असतो. काही टचपॅडमध्येच स्क्रीन वर-खाली करण्यासाठी स्क्रोलची सोय असते.
* लॅपटॉपचा खालचा भाग शक्यतो जास्त गरम होणारा नसावा. कारण बऱ्याच वेळेस लॅपटॉप लोक आपल्या मांडीवर ठेवून काम करतात.
* लॅपटॉप शक्यतो आयताकृती स्क्रीनचा असावा. त्याचं स्क्रीन रिझोल्युशन किमान १०२४ ३ ७६८ पिक्सेल व त्यापुढील असावं. जेणेकरून चांगल्या प्रकारे चित्र दिसावं.
* सध्या लॅपटॉपला बाहेरून जोडणाऱ्या (पेन ड्राइव्ह, मोबाइल, हार्ड-डिस्क, कॅमेरा) गोष्टी यूएसबी प्रकारामध्ये येतात त्यामुळे किमान चार एसबी पोर्ट असणे आवश्यक आहे.

* त्याचप्रमाणे सध्या पेन ड्राइव्हप्रमाणेच मेमरी कार्डचा वापरही वाढला आहे. त्यामुळे मेमरी कार्ड जोडण्याची सोय असल्यास चांगलं. जरी ते नसेल तरी काही अडचण नाही कारण सध्या यूएसबी मेमरी कार्ड रिडर शंभर-दीडशे रुपयांना मिळतात.
* लॅपटॉपमध्ये वायरलेस नेटवर्क असणं गरजेचं होत चाललं आहे. कारण भविष्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणीही वायरलेस नेटवर्कने इंटरनेटची सोय उपलब्ध होईल त्यावेळी वायरलेस नेटवर्कद्वारे कुठेही वापरणं सोपं होईल.
* मोबाइलमधील सध्या नवीन येणाऱ्या लॅपटॉपमध्ये ब्ल्यू-टूथची सोय असते. ज्याद्वारे लॅपटॉपमधून मोबाइल अथवा मोबाइलमधून लॅपटॉपमध्ये माहितीची देवाणघेवाण कुठल्याही केबलशिवाय अडणार नाही.
* सीडीसोबत सध्या डीव्हीडीचा वापरही बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे आपल्या लॅपटॉपमध्ये डीव्हीडीवर लिहिण्याची म्हणजेच डिव्हीडी राइटची करण्याची सोय असणं गरजेचं आहे.
* जर कधी आपला लॅपटॉप चोरीस गेला तर तो वापरला जाऊ नये यासाठी तो आपोआप लॉक होईल, अशी सोय असावी. त्यामुळे जर एखाद्या ठिकाणी आपला लॅपटॉप वापरला जातोय, हेही होऊ शकतं.

* लॅपटॉपची गॅरंटी हा तितकाच महत्त्वाचा भाग की आपण जिथून लॅपटॉप विकत घेत आहोत त्यात ते गॅरंटी किती वर्षांची देत आहेत शिवाय ते काय सुविधा देत आहेत, हे पाहणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की लॅपटॉपच्या बॅटरीची कुणीच गॅरंटी देत नाहीत.

आपल्याला जर लॅपटॉप बॅटरीची जास्त काळ वापरायची असेल तर शक्यतो जिथे-जिथे लॅपटॉप वापरत असाल तिथे इलेक्ट्रिक पॉवरची सोय असल्यास लॅपटॉप त्यावर चालवावा. जास्त वेळ लॅपटॉपच्या अंतर्गत बॅटरीवर लॅपटॉप चालवल्यास ती लवकर संपुष्टात येण्याची शक्यता असते.

शेवटी आपण आपला लॅपटॉप कसा वापरतो यावरही त्याचं आयुष्य ठरतं. उगाच इतरांना दाखवण्यासाठी (छाप पाडण्यासाठी) गरज नसताना लॅपटॉपसारखा वापर केला तर त्याच्या नुकसानाचं आपणच जबाबदार असाल.

0 टिप्पणी(ण्या):