महाराष्ट्र टाईम्स
Link -
http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5213037.cms
ई-मेलसाठी अमर्यादित जागा, अधिक सुविधा, सुरक्षितता आणि चुटकीसरशी काम व्हावं असा वेग, अशी आश्वासनं देत २००४ रोजी सुरू झालेले गुगलचे जी-मेल त्यांच्या आश्वासनांची बऱ्यांपैकी पूर्तता करत आता सर्वांसाठी ७ जीबी (गिगा बाइट) इतकी जागा देत आहे.
आपण जेव्हा जी-मेलचं पान उघडता तेव्हा त्या पानाच्या डाव्या बाजूच्या जागेमध्ये lots of space या शीर्षकाखाली आपणास प्रत्यक्षात गुगल ई-मेलसाठी किती देत आहे याची संख्या दिसेल. तसंच ती जागा सतत वाढत असल्याचंही तिथे दाखवलं आहे. परंतू जर आपण या सतत वाढणाऱ्या आकड्यांचं एका दिवसाचं गणित केल्यास आपल्याला कळेल की जी-मेल एका दिवसागणिक १ एमबी (मेगा बाइट) जागा वाढवत नाही.
लोकांच्या गरजा लक्षात घेता गुगलने जी-मेलमध्ये आतापर्यंत बऱ्याच प्रमाणात निरनिराळ्या गोष्टींची भर केली आहे. तसंच नविन भविष्यकालीन अधिकाधिक गरजांची आवश्यकता लक्षात घेता वेळोवेळी अत्याधुनिक सुविधा जी-मेलमध्ये जमा होत आहेत. तरी लोकांच्या गरजा वाढतच आहेत. त्यामुळेच ई-मेलची जागा कितीही वाढवली तरी ती कमी पडणारचं.म्हणूनच भविष्यामध्ये जी-मेलचा बॅकअपची गरज सर्वांनाच पडू शकेल. सध्यातरी जी-मेलमधील आपल्या ई-मेलचे बॅकअप घेण्याचे चांगले तीन पर्याय उपलब्ध आहेत.
आऊटलूक एक्सप्रेस
पहिल्या प्रकारामध्ये आपण जी-मेलचे ई-मेल्स आपण आपल्या कम्प्युटरच्या आऊटलूक एक्सप्रेस सॉफ्टवेअरमध्ये डाऊनलोड करू शकता. विंडोजमध्ये आऊटलूक एक्सप्रेस हा सॉफ्टवेअर विंडोजसोबत मोफत मिळतो. या साफ्ॅटवेअरचा फायदा असा की ई-मेल्स ऑॅफलाइन म्हणजेच इंटरनेट कनेक्ट नसतानाही पाहू शकता. तसंच आपण हवे तेवढे ई-मेल्स तयार करून ठेवू शकता आणि नंतर पाठवता येतात.
सध्यातरी आपण आऊटलूक एक्सप्रेस सॉफ्टवेअरमध्ये आपल्या खासगी वेबसाइटवरील ई-मेल तसंच मोफत ई-मेल सेवा देणाऱ्या (याहू, हॉटमेल, रिडीफ, जी-मेल इ.) पैकी फक्त जी-मेलचे ई-मेल डाऊनलोड करू शकता. कारण अजूनही याहू, हॉटमेल, रिडीफ या वेबसाइट सॉफ्टवेअरमध्ये ई-मेल डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यासाठी पैसे आकारतात.
आपले जी-मेलचे ई-मेल सॉफ्टवेअरमध्ये डाऊनलोड करण्यासाठी तसंच पाठवण्यासाठी आपल्या जी-मेल खात्यामध्ये तसेच सॉफ्टवेअरमध्ये काही सेटिंग्ज करावी लागते, यासाठी फक्त पाच ते दहा मिनिटं लागतात.
आपलं जी-मेलचं ई-मेल सुरू करा.
उजव्या बाजूच्या सेटींग्ज या विभागावर क्लिक करा
आता 'Forwarding and POP/IMAP' विभागावर क्लिक करा आणि त्यामध्ये 'POP Download' पर्यायावर क्लिक करा.
आता खालील Save बटणावर क्लिक करा.
आता आपल्या कम्प्युटरमधील आऊटलूक एक्सप्रेस सॉफ्टवेअर सुरू करा.
टूलबारमधील Tools विभागातील Accounts वर क्लिक करा.
आता आपल्यासमोर एक छोटा चौकोन उघडेल त्यातील Mail मधिल Add वर क्लिक करा.
Display name समोर आपलं नाव लिहा आणि खालील Next बटणावर क्लिक करा.
आता Email addresss पुढे आपला तोच जी-मेलचा ई-मेल पत्ता लिहा आणि खालील Next बटणावर क्लिक करा.
आता पुढील चौकोनामध्ये आपल्याला Incoming mail (POP3)च्या खाली pop.gmail.com तर Outgoing mail (SMTP)ज्च्या खाली smtp.gmail.com असं टाइप करा आणि खालील Next बटणावर क्लिक करा.
आता पुढील चौकोनामध्ये आपल्याला आपला संपूर्ण जी-मेलचा ई-मेल पत्ता व पासवर्ड द्या आणि खालील Finish बटणावर क्लिक करा.
आता तोच मागचचा चौकोन आपल्यासमोर येईल तिथे आपल्याला pop.gmail.com असं दिसेल त्यावर डबल क्लिक करा. त्यामुळे अजून एक छोटा चौकोन उघडेल.
या छोट्या चौकोनामध्ये समोर आपलं नाव पुन्हा टाइप करा. वरील विभागातील Servers मधील My server requires authentication वर क्लिक करा.
आता परत वरील विभागातील Advanced वर क्लिक करा,
त्यातील Outloing Mail (SMTP) वर क्लिक करून त्याची संख्या ४६५ च्ढ्ढठ्ठष्श्ाद्वद्बठ्ठद्द द्वड्डद्बद्य (क्कह्रक्क३)ज् वर क्लिक करून त्याची संख्या ९९५ टाइप करून खालील च्ह्र्यज् या बटणावर व नंतर ncoming mail (POP3) या बटणावर क्लिक करा.
बस्स आपणास इतकेच करायचे आहे. वरील सर्व क्रिया करण्यासाठी साधारण ५-१० मिनिटं लागतात. हा प्रकार थोडासा किचकट असला तरी चांगला पर्याय आहे. याचा फायदा असा की नंतर आपण आपले जी-मेलचे ई-मेल्स आपल्या कम्प्युटरमधील आऊटलूक सॉफ्टवेअरमधून पाठवू शकता आणि त्याची एक प्रत आपोआप आपल्या जी-मेलमध्ये जमा होते. जणू काही आपण तो ई-मेल जीमेलमधूनच पाठवला होता.
सॉफ्टवेअर डाऊनलोड
या प्रकारामध्ये आपल्याला जी-मेल बॅकअप नावाचा एक मोफत सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्यावा लागेल. www.gmail-backup.com या वेबसाइटवरून आपण हा सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकता. साधारण ४ एमबी साइज असलेला हा प्रोग्रॅम लगेच डाऊनलोड होतो. हा सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यानंतर प्रथम तो आपल्या कम्प्युटरमध्ये लोड करावा लागतो. हा वापरायला फारच सोप्पा आहे. यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला आपला संपूर्ण जी-मेलचा ई-मेल पत्ता, पासवर्ड, ई-मेलचा बॅकअप कुठे सेव्ह व्हायला हवा तो फोल्डर आणि ज्या तारखेपासूनचा बॅकअप घ्यायचा ती तारीख या गोष्टी दिल्या की त्याखालील बॅकअप बटणावर क्लिक करून आपण आपल्या जी-मेलच्या ई-मेलचा बॅकअप घेऊ शकता.
या सॉफ्टवेअरचं अजून एक वैशिष्ट्य असं की ज्याप्रमाणे आपण जी-मेलचे ई-मेल डाऊनलोड करून त्यांचा बॅकअप घेऊ शकतो, त्याच प्रकारे डाऊनलोड करून बॅकअप घेतलेल्या ई-मेल्सना आपण परत आपल्या दुसऱ्या जी-मेल खात्यामध्ये Restore म्हणजेच जसंच्यातसं जमा करू शकता. अशाप्रकारे एका जी-मेल खात्यामधून डाऊनलोड केलेले ई-मेल्स दुसऱ्या जी-मेल खात्यामध्ये Restore केलेले ई-मेल्स जणू काही त्याच जी-मेल खात्यातील असल्याप्रमाणे वाटतात.
ऑनलाइन बॅकअप
जी-मेलमधील आपल्या ई-मेलचा बॅकअप घेण्याचा अजून तिसरा पर्यायही उपलब्ध आहे. यात मजेची गोष्ट अशी की जी-मेलचा बॅकअप आपण याहू मेल अथवा रिडीफमेलवर घेणार आहोत. याहू आणि रिडीफ सध्या ई-मेलसाठी अमर्यादित जागा देत असल्याने इथे त्यांचे नाव सुचवलं आहे. याहूमेल अथवा रिडीफमेलवर बॅकअप घेण्यासाठी प्रथम आपल्याला याहूमेलवर अथवा रिडीफमेलवर एक ई-मेल अकाउण्ट बनवावा लागेल. जी-मेलच्या खात्यामध्ये सेटिंग्स (Settings) या विभागामध्ये Forwarding and POP/IMAP मध्ये Forwarding या जागेमध्ये आपल्याला आलेले ई-मेल्स ज्या याहूमेलवर अथवा रिडीफमेलवर हवा आहे तो द्यावा. हणजे मग भविष्यामध्ये आपल्याला जी-मेलवर आलेल्या प्रत्येक मेलची एक प्रत याहूमेलवर अथवा रिडीफवर फॉरवर्ड केली जाते.
सध्यातरी आपल्याला जी-मेलचा बॅकअपची गरज वाटत नसली तरी कुठलीही माहिती ही नेहमीच उपयोगाची असते, न जाणो आज नाही पण लवकरच तुम्हाला जी-मेलचा बॅकअप घेण्याची गरज पडली तर मग आपल्याला हा लेख पुन्हा वाचण्याची गरज भासेल