This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Anil Singh - Bloggertemplatez.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Anil Singh - Bloggertemplatez.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Anil Singh - Bloggertemplatez.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Anil Singh - Bloggertemplatez.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Anil Singh - Bloggertemplatez.com.

शुक्रवार, २० जुलै, २०१२

तुम्हीच बना विंडोजचे मॅकेनिक!

महाराष्ट्र टाईम्स Link - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4689617.cms

बऱ्याच वेळेस एखादं सॉफ्टवेअर कम्प्युटरमधून काढल्यानंतर अथवा एखादं हार्डवेअर काही काळानंतर ते कम्प्युटरमधून Remove / Uninstall केल्यानंतर त्याचा प्रोग्राम काढल्यानंतर एखादा एररचा मेसेज विंडोज सुरू करताना येतो. म्हणजेच त्या प्रोग्राम अथवा हार्डवेअरच्या फाइल्स अथवा डाइव्हर्स काढताना त्यामध्ये विंडोज एक्स्पीच्या काही महत्त्वाच्या फाइल्सही डिलीट झाल्या असल्यास त्यामुळे विंडोज एक्स्पीमध्ये काही प्रोग्राम्सना प्रॉब्लेम येत असल्यास एररचा मेसेज विंडोजच्या सुरुवातीला दाखवला जातो.



हा प्रॉब्लेम प्रामुख्याने विंडोजच्या रजिस्ट्रीमध्ये निर्माण झालेने विंडोजच्या सुरुवातीलाच हा एरर मेसेज दाखवला जातो. विंडोजमधील काही महत्त्वाच्या फाइल्स डिलीट झाल्याने तसा एखादा मेसेज दाखवला जातो. विंडोज रजिस्ट्रीमध्ये निर्माण झालेला हा प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी 'रजिस्ट्री क्लिनर'सारखे प्रोग्राम्स वापरले जातात (असे प्रोग्राम्स इंटरनेटरवर मिळतात) पण बऱ्याच वेळेस आपणही अशा प्रोग्रॅम्सशिवाय विंडोजमधील एखादा एरर काढून टाकू शकतो. हा एरर काढण्यासाठीही विंडोजमध्ये सोय केलेली आहे.


विंडोजमध्ये त्यासाठी SFC SCAN ही कमांड वापरली जाते. या कमांडने विंडोजच्या रजिस्ट्रीमध्ये डिलीट अथवा खराब झालेल्या फाइल्स शोधून त्या बदलल्या जातात. निर्माण झालेला प्रॉब्लेम काढला जातो आणि नंतर विंडोजच्या सुरुवातीलाच येणारा एरर मेसेज बंद होतो. अशाप्रकारे SFC SCAN ह ही कमांड वापरताना विंडोजची म्हणजेच आपण जर विंडोज एक्स्पी वापरत असाल तर विंडोज एक्स्पीची सीडी अथवा विंडोज विस्टा वापरत असाल तर विंडोज विस्टाची सीडी विचारली जाते, ती सीडी ड्राइव्हमध्ये असणं आवश्यक आहे.


ही कमांड वापरण्याची पद्धत पुढीलप्रमाणे

१. स्टार्ट बटणावरील रन या बटणावर क्लिक करा.

२. आता आपल्यासमोर रन या विभागातील विंडो उघडेल. त्यामध्ये ष्द्वस्त्र हे टाईप करून च्ह्र्यज् या बटणावर क्लिक करा.

३. आता आपल्यासमोर काळ्या रंगाची डॉस प्रॉम्प्टची विंडो उघडेल, त्यामध्ये sfc/scannow असं टाइप करून एंटरचं बटण दाबा आणि ती डॉस प्रॉम्प्टची काळी विंडो बंद करा.

४. आता आपल्यासमोर 'Windows File Protection' चा प्रोग्रॅम सुरू होईल. लक्षात असू द्या हा प्रोग्राम वापरताना वर सांगितल्याप्रमाणे कम्प्युटरमध्ये सीडी असणं आवश्यक आहे.

विण्डोज Xp मधला लपाछपीचा खेळ

महाराष्ट्र टाईम्स
Link - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3600008,prtpage-1.cms

आपला कम्प्युटर हा हत्तीसारखा असतो... त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे... कारण या कम्प्युटरमध्ये अनेक प्रोग्राम्स दडलेले असतात. जे वापरण्यासाठी आपले नेहमीचे आयकॉन किंवा स्टार्ट बटन-प्रोग्राम असा रस्ता चालत नाही. त्यासाठी काही छुपे रस्ते असतात. या छुप्या रस्त्यांवरून जर आपण हा लपाछपीचा खेळ खेळला तर अनेक गोष्टी सापडू शकतात.


आज आपल्याकडे बहुसंख्य कम्प्युटरमध्ये विण्डोज xp ही ऑपरेटिंग सिस्टम वापरलेली असते. या ङ्गक्क मध्ये दडलेले अनेक प्रोग्राम्स शोधण्यासाठी आजच्या टेकट्रिक्स... यात आपण अशा काही कमाण्ड समजून घेऊ, ज्यामुळे आपण टेक्नोसॅवी कॉम्पयुझर म्हणून कॉलर टाइट करू शकू. यासाठी खाली दिलेल्या कमाण्ड वापरून तर बघा.

विण्डोजमधील स्टार्ट बटणावरील Run वर क्लिक करा. त्यानंतर येणाऱ्या विण्डोमध्ये खाली दिलेल्या प्रोग्रामच्या शॉर्टकट टाइप करून एण्टर मारल्यास तो प्रोग्राम सुरू होईल.

१.आपल्या की-बोर्डवर अनेक चिन्हं नसतात हे माहितेय... अशी अनेक निरनिराळी चिन्हं आणण्यासाठी Run विण्डोमध्ये charmap ही कमाण्ड देऊन तर बघा.

२.कम्प्युटरमधील अनावश्यक फाइली नष्ट करणारा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : cleanmgr

३.कॉपी केलेली गोष्ट पाहण्यासाठी तसंच साठवण्याचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : clipbrd

४.विशिष्ट प्रोग्राममधील प्रॉब्लेम शोधणारा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : drwtsn32

५.कम्प्युटरमधील साऊण्ड आणि व्हिडीओ कार्डबद्दलची माहिती पाहण्यासाठी : dxdiag

६.स्वत:चा नवीन अक्षर तयार करण्यासाठीचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ( Private character editor ) : eudcedit

७.आपणहून उघडणारा आणि इन्स्टॉल करणारा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ( IExpress Wizard ) : iexpress

८.नेटवर्किंगमध्ये असलेल्या कम्प्युटरमधील फाइल्स ऑॅफलाइन असताना एकत्र करण्यासाठीचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ( Microsoft Synchronization Manager ) : mobsync

९.विण्डोज मीडिया प्लेअरचं जुनं व्हर्जन सुरू करण्यासाठी ( Windows Media Player 5.1 ) : mplay32

१०. आपल्या कम्प्युटरमधील अंतर्गत व्यवस्थेची माहिती पाहण्यासाठीचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : packager

११. विण्डोजमधील सॉफ्टवेअरच्या अंतर्गत नोंदी पाहण्यासाठी : regedt32 किंवा regedit

१२. नेटवर्किंगमध्ये असलेल्या कम्प्युटरमध्ये देवाण-घेवाणीचा फोल्डर बनवण्यासाठी : shrpubw

१३. कम्प्युटरमधील डिजिटल सिग्नेचर पडताळण्याचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ( File siganture verification tool ) : sigverif

१४. आवाज कमी-जास्त करण्याचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : sndvol32

१५. विण्डोजमधील सॉफ्टवेअर तसंच हार्डवेअरच्या ड्राइव्हर फाइली पडताळणारा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : verifier

मेलचा बॅकअप

महाराष्ट्र टाईम्स
Link - http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5213037.cms

ई-मेलसाठी अमर्यादित जागा, अधिक सुविधा, सुरक्षितता आणि चुटकीसरशी काम व्हावं असा वेग, अशी आश्वासनं देत २००४ रोजी सुरू झालेले गुगलचे जी-मेल त्यांच्या आश्वासनांची बऱ्यांपैकी पूर्तता करत आता सर्वांसाठी ७ जीबी (गिगा बाइट) इतकी जागा देत आहे.

आपण जेव्हा जी-मेलचं पान उघडता तेव्हा त्या पानाच्या डाव्या बाजूच्या जागेमध्ये lots of space या शीर्षकाखाली आपणास प्रत्यक्षात गुगल ई-मेलसाठी किती देत आहे याची संख्या दिसेल. तसंच ती जागा सतत वाढत असल्याचंही तिथे दाखवलं आहे. परंतू जर आपण या सतत वाढणाऱ्या आकड्यांचं एका दिवसाचं गणित केल्यास आपल्याला कळेल की जी-मेल एका दिवसागणिक १ एमबी (मेगा बाइट) जागा वाढवत नाही.

लोकांच्या गरजा लक्षात घेता गुगलने जी-मेलमध्ये आतापर्यंत बऱ्याच प्रमाणात निरनिराळ्या गोष्टींची भर केली आहे. तसंच नविन भविष्यकालीन अधिकाधिक गरजांची आवश्यकता लक्षात घेता वेळोवेळी अत्याधुनिक सुविधा जी-मेलमध्ये जमा होत आहेत. तरी लोकांच्या गरजा वाढतच आहेत. त्यामुळेच ई-मेलची जागा कितीही वाढवली तरी ती कमी पडणारचं.म्हणूनच भविष्यामध्ये जी-मेलचा बॅकअपची गरज सर्वांनाच पडू शकेल. सध्यातरी जी-मेलमधील आपल्या ई-मेलचे बॅकअप घेण्याचे चांगले तीन पर्याय उपलब्ध आहेत.

आऊटलूक एक्सप्रेस

पहिल्या प्रकारामध्ये आपण जी-मेलचे ई-मेल्स आपण आपल्या कम्प्युटरच्या आऊटलूक एक्सप्रेस सॉफ्टवेअरमध्ये डाऊनलोड करू शकता. विंडोजमध्ये आऊटलूक एक्सप्रेस हा सॉफ्टवेअर विंडोजसोबत मोफत मिळतो. या साफ्ॅटवेअरचा फायदा असा की ई-मेल्स ऑॅफलाइन म्हणजेच इंटरनेट कनेक्ट नसतानाही पाहू शकता. तसंच आपण हवे तेवढे ई-मेल्स तयार करून ठेवू शकता आणि नंतर पाठवता येतात.

सध्यातरी आपण आऊटलूक एक्सप्रेस सॉफ्टवेअरमध्ये आपल्या खासगी वेबसाइटवरील ई-मेल तसंच मोफत ई-मेल सेवा देणाऱ्या (याहू, हॉटमेल, रिडीफ, जी-मेल इ.) पैकी फक्त जी-मेलचे ई-मेल डाऊनलोड करू शकता. कारण अजूनही याहू, हॉटमेल, रिडीफ या वेबसाइट सॉफ्टवेअरमध्ये ई-मेल डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यासाठी पैसे आकारतात.
आपले जी-मेलचे ई-मेल सॉफ्टवेअरमध्ये डाऊनलोड करण्यासाठी तसंच पाठवण्यासाठी आपल्या जी-मेल खात्यामध्ये तसेच सॉफ्टवेअरमध्ये काही सेटिंग्ज करावी लागते, यासाठी फक्त पाच ते दहा मिनिटं लागतात.
आपलं जी-मेलचं ई-मेल सुरू करा.

उजव्या बाजूच्या सेटींग्ज या विभागावर क्लिक करा

आता 'Forwarding and POP/IMAP' विभागावर क्लिक करा आणि त्यामध्ये 'POP Download' पर्यायावर क्लिक करा.

आता खालील Save बटणावर क्लिक करा.

आता आपल्या कम्प्युटरमधील आऊटलूक एक्सप्रेस सॉफ्टवेअर सुरू करा.

टूलबारमधील Tools विभागातील Accounts वर क्लिक करा.

आता आपल्यासमोर एक छोटा चौकोन उघडेल त्यातील Mail मधिल Add वर क्लिक करा.

Display name समोर आपलं नाव लिहा आणि खालील Next बटणावर क्लिक करा.

आता Email addresss पुढे आपला तोच जी-मेलचा ई-मेल पत्ता लिहा आणि खालील Next बटणावर क्लिक करा.

आता पुढील चौकोनामध्ये आपल्याला Incoming mail (POP3)च्या खाली pop.gmail.com तर Outgoing mail (SMTP)ज्च्या खाली smtp.gmail.com असं टाइप करा आणि खालील Next बटणावर क्लिक करा.

आता पुढील चौकोनामध्ये आपल्याला आपला संपूर्ण जी-मेलचा ई-मेल पत्ता व पासवर्ड द्या आणि खालील Finish बटणावर क्लिक करा.

आता तोच मागचचा चौकोन आपल्यासमोर येईल तिथे आपल्याला pop.gmail.com असं दिसेल त्यावर डबल क्लिक करा. त्यामुळे अजून एक छोटा चौकोन उघडेल.

या छोट्या चौकोनामध्ये समोर आपलं नाव पुन्हा टाइप करा. वरील विभागातील Servers मधील My server requires authentication वर क्लिक करा.

आता परत वरील विभागातील Advanced वर क्लिक करा,

त्यातील Outloing Mail (SMTP) वर क्लिक करून त्याची संख्या ४६५ च्ढ्ढठ्ठष्श्ाद्वद्बठ्ठद्द द्वड्डद्बद्य (क्कह्रक्क३)ज् वर क्लिक करून त्याची संख्या ९९५ टाइप करून खालील च्ह्र्यज् या बटणावर व नंतर ncoming mail (POP3) या बटणावर क्लिक करा.

बस्स आपणास इतकेच करायचे आहे. वरील सर्व क्रिया करण्यासाठी साधारण ५-१० मिनिटं लागतात. हा प्रकार थोडासा किचकट असला तरी चांगला पर्याय आहे. याचा फायदा असा की नंतर आपण आपले जी-मेलचे ई-मेल्स आपल्या कम्प्युटरमधील आऊटलूक सॉफ्टवेअरमधून पाठवू शकता आणि त्याची एक प्रत आपोआप आपल्या जी-मेलमध्ये जमा होते. जणू काही आपण तो ई-मेल जीमेलमधूनच पाठवला होता.



सॉफ्टवेअर डाऊनलोड

या प्रकारामध्ये आपल्याला जी-मेल बॅकअप नावाचा एक मोफत सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्यावा लागेल. www.gmail-backup.com या वेबसाइटवरून आपण हा सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकता. साधारण ४ एमबी साइज असलेला हा प्रोग्रॅम लगेच डाऊनलोड होतो. हा सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यानंतर प्रथम तो आपल्या कम्प्युटरमध्ये लोड करावा लागतो. हा वापरायला फारच सोप्पा आहे. यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला आपला संपूर्ण जी-मेलचा ई-मेल पत्ता, पासवर्ड, ई-मेलचा बॅकअप कुठे सेव्ह व्हायला हवा तो फोल्डर आणि ज्या तारखेपासूनचा बॅकअप घ्यायचा ती तारीख या गोष्टी दिल्या की त्याखालील बॅकअप बटणावर क्लिक करून आपण आपल्या जी-मेलच्या ई-मेलचा बॅकअप घेऊ शकता.

या सॉफ्टवेअरचं अजून एक वैशिष्ट्य असं की ज्याप्रमाणे आपण जी-मेलचे ई-मेल डाऊनलोड करून त्यांचा बॅकअप घेऊ शकतो, त्याच प्रकारे डाऊनलोड करून बॅकअप घेतलेल्या ई-मेल्सना आपण परत आपल्या दुसऱ्या जी-मेल खात्यामध्ये Restore म्हणजेच जसंच्यातसं जमा करू शकता. अशाप्रकारे एका जी-मेल खात्यामधून डाऊनलोड केलेले ई-मेल्स दुसऱ्या जी-मेल खात्यामध्ये Restore केलेले ई-मेल्स जणू काही त्याच जी-मेल खात्यातील असल्याप्रमाणे वाटतात.


ऑनलाइन बॅकअप

जी-मेलमधील आपल्या ई-मेलचा बॅकअप घेण्याचा अजून तिसरा पर्यायही उपलब्ध आहे. यात मजेची गोष्ट अशी की जी-मेलचा बॅकअप आपण याहू मेल अथवा रिडीफमेलवर घेणार आहोत. याहू आणि रिडीफ सध्या ई-मेलसाठी अमर्यादित जागा देत असल्याने इथे त्यांचे नाव सुचवलं आहे. याहूमेल अथवा रिडीफमेलवर बॅकअप घेण्यासाठी प्रथम आपल्याला याहूमेलवर अथवा रिडीफमेलवर एक ई-मेल अकाउण्ट बनवावा लागेल. जी-मेलच्या खात्यामध्ये सेटिंग्स (Settings) या विभागामध्ये Forwarding and POP/IMAP मध्ये Forwarding या जागेमध्ये आपल्याला आलेले ई-मेल्स ज्या याहूमेलवर अथवा रिडीफमेलवर हवा आहे तो द्यावा. हणजे मग भविष्यामध्ये आपल्याला जी-मेलवर आलेल्या प्रत्येक मेलची एक प्रत याहूमेलवर अथवा रिडीफवर फॉरवर्ड केली जाते.

सध्यातरी आपल्याला जी-मेलचा बॅकअपची गरज वाटत नसली तरी कुठलीही माहिती ही नेहमीच उपयोगाची असते, न जाणो आज नाही पण लवकरच तुम्हाला जी-मेलचा बॅकअप घेण्याची गरज पडली तर मग आपल्याला हा लेख पुन्हा वाचण्याची गरज भासेल

ई-सफाई इज मस्ट!

महाराष्ट्र टाईम्स
Link - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3122016.cms

कम्प्युटर आधी फास्ट चालायचा पण आता तो जाम म्हणजे जामच स्लो झालाय... असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत? देन नॉट टू वरी. प्रत्येक कम्प्युटर युजरला हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. त्यातून 'वे आऊट' काढण्यासाठीच आजच्या टेकट्रिक्स...
१. कम्प्युटरमध्ये नेहमी अनावश्यक 'टेम्पररी फाईल्स' तयार होत असतात. विशेषत: इण्टरनेटचा वापर होणाऱ्या कम्प्युटरमध्ये त्या जास्त प्रमाणात असतात. या फाईल्स कमी केल्या तर कॉम्प बराच फास्ट होऊ शकतो. त्यासाठी 'डिस्क क्लिनअप'चा ऑप्शन वापरून टेम्प फाईल्सना 'रिसायकल बिन' मध्ये टाकता येतं.
' डिस्क क्लिनअप' करण्यासाठी डेस्कटॉपवर डाव्या बाजूला खाली असणाऱ्या 'स्टार्ट' बटणावरून आपला प्रवास सुरू करायचा. स्टार्ट-प्रोग्राम-अॅक्सेसरीज-सिस्टिम टूल अशा वाटेने जाऊन 'डिस्क क्लिनअप'चा ऑप्शन क्लिक करायचा. या प्रोसेसनंतर कम्प्युटरने ड्राइव्ह निवडायला सांगितलं तर जो ड्राइव्ह क्लिन करायचाय तो निवडून ई-साफसफाई करून टाकायची. साधारणत: दर आठवड्यातून एकदा तरी अशी साफसफाई करत राहायची. नाहीतर उगाच गारबेज साठून राहिलं तर मशिन स्लो होणारच!
२. शक्यतो दिवसातून एकदा तरी कम्प्युटरची कचरापेटी म्हणजे 'रिसायकल बिन' साफ करावी. त्यासाठी 'रिसायकल बिन'वर राईटक्लिक करून 'Empty Recycle Bin' अशी कमाण्ड देता येते.
३. कम्प्युटर शिस्तप्रिय वगैरे वाटत असेल तर तो आपला भ्रम आहे. तो सगळ्या फाईल्स व्यवस्थित ड्राइव्हमध्ये सेव्ह आहेत असं दाखवत असला तरी प्रत्यक्षात मात्र तो इतका अव्यवस्थित आहे की हार्डडिस्कमध्ये आपल्या फाईल्स कशाही कोंबत असतो. दाखवताना त्यांची लेबल मात्र ड्राइव्हमध्ये दाखवतो. यामुळे कम्प्युटरच्या कामाचा वेग स्लो होत जातो.

हे टाळण्यासाठी पुन्हा एकदा स्टार्ट-प्रोग्राम्स-अॅक्सेसरीज-सिस्टिम टूलच्या वाटेने जायचं आणि 'डिस्क डिफ्रॅग्मेण्टर'चा प्रोग्राम सुरू करायचा. पण 'डिफ्रॅग्मेण्टेशन' म्हणजे फुरसतीचं काम आहे. कम्प्युटरमध्ये ड्राइव्ह आणि डेटा जेवढा जास्त तेवढा 'डिफ्रॅग्मेण्टेशन'ला जास्त वेळ लागतो. कदाचित दोन ते तीन तासही लागू शकतात. त्यामुळे रात्री झोपताना मशिन 'डिफ्रॅग्मेंटेशन'ला लावू शकतो. 'डिफ्रॅग्मेण्टर' सुरू केल्यानंतर ड्राइव्ह निवडायची कमाण्ड येते. जो ड्राइव्ह रिअरेंज करायचाय तो मेन्शन करायचा. 'डिफ्रॅग्मेण्टेशन'मुळे खूप जागा अॅवलेबल झाल्यामुळे मशिन फास्ट होण्यास मदत होते. साधारणत: महिन्यातून एकदा अशी मोठ्ठी साफसफाई करायची.
त्यात बिलकुल आळस चालणार नाही. कारण तुमचा कम्प्युटर फास्ट चालावा असं वाटत असेल तर ही ई-साफसफाई अगदी मस्टच!

ई-मेल हॅक झालाय बहुतेक!

महाराष्ट्र टाईम्स Link - http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-5065971,prtpage-1.cms

आपला ई-मेल उघडत नसेल तर माझा ई-मेल हॅक झाला असावा बहूतेक असं बऱ्याच लोकांना वाटू लागते. आपण आपला ई-मेल आणि पासवर्ड व्यवस्थित टाइप केलेला असतो पण तरीही ई-मेल खातं उघडत नाही मग काय प्रॉब्लेम आसवा तर नक्कीच तो कुणीतरी हॅक केला असवा. कारण या व्यतिरीक्त इतर दुसरं कुठलंचकारण असूच शकत नाही. सध्या अशा ती बऱ्याच ऐकायला मिळतात. मग ज्याचा ई-मेल (त्याच्या मते) हॅक झालेला असतो, त्याला तो ई-मेल भविष्यात विसरून नवीन ई-मेल खातं उघडण्याशिवाय इतर काही पर्याय नसतो. मग त्या आपल्या (हॅक झालेल्या)/ ई-मेल खात्यातील सर्व महत्त्वाच्या ई-मेल्सवर पाणी सोडावं लागतं. कारण नंतर आपला ई-मेल (हॅक झाल्याने) भविष्यामध्ये आपल्याला कधीच मिळणार नाही, अशी त्यांना खात्री होते.
परंतू प्रत्यक्षात आपला ई-मेल इतर दुसऱ्या काही कारणामुळे बंद झाला असावा का, असा विचारही बरेच लोक करत नाहीत आणि त्यामूळे आपल्या बंद झालेल्या ई-मेलवर काही इलाज असू शकत नाही असा ठाम विचार केल्याने ती लोक आपलेच नुकसान करीत असतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला ई-मेल अॅक्सेस होत नाही म्हणजे तो हॅक झाला, असा विचार करणं चुकीचं आहे. एखादा ई-मेल न चालण्याची बरीच कारणं असू शकतात जी प्रथम पडताळणं आवश्यक असतात कारण अशाच कारणामुळे आपला ई-मेल खरंच बंद पडला आहे का ते आपल्याला कळेल.
१ बऱ्याच वेळेस आपले एकापेक्षा जास्त ई-मेल असतात तर त्याचे पासवर्ड निरनिराळे असल्याने आपण आपल्या दुसऱ्याच एका ई-मेलचा पासवर्ड आपल्या निराळ्या ई-मेलसाठी वापरतो आणि पर्यायाने तो चालत नाही. त्यामुळे शक्यतो आपल्या इतर ई-मेलसाठी सारखाच पासवर्ड वापरावा.
२ बराच काळ आपण आपला एखादा ई-मेल न वापरल्यास आपण त्याची स्पेलिंग विसरण्याची शक्यता असते अशावेळेस आपल्याला आपला पासवर्ड आठवत असतो पण/ ई-मेलचा यूझर आयडीच व्यवस्थित न दिल्याने आपला ई-मेल चालत नाही.
३ काही लोकांना आपले अनेक ई-मेल वापरण्याची सवय असते तर ते सुरक्षिततेसाठी आपल्या प्रत्येक ई-मेलला निरनिराळा पासवर्ड देतात मग काहीवेळेस ते आपल्या एका ई-मेलचा पासवर्ड चुकून दुसरा ई-मेल उघडताना देतात. सहाजिकच तो न चालल्याने मग ते तोच पासवर्ड परत-परत टाईप करतात. अशाप्रकारे चुकीचा पासवर्ड सारखा दिल्याने तो ई-मेल उघडत तर नाहीच पण बऱ्याच वेळेस तो सुरक्षिततेसाठी र्सव्हरमुळे ब्लॉक होण्याची शक्यता असते. असा ब्लॉक झालेला ई-मेल मग पुन्हा मिळवताना आपल्याला मग आपणच दिलेल्या गुपित प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं ते दिल्यानंतरच मग आपण पुन्हा आपला ई-मेल उघडू शकतो.
४ कम्प्युटरशी जराही संबंध नसलेले बरेच लोक उगाच बऱ्याच वेळेस दुसऱ्याच्या मदतीने आपला नवीन ई-मेल तयार करून घेतात. पण तो ई-मेल उघडायचा कसा आणि त्यातील आपले ई-मेल पाहायचे कसे, याचे त्यांना पुरेसे ज्ञान नसल्याने एकट्याने आपले ई-मेल खाते उघडताना बऱ्याच चुका केल्याने त्यांना त्यांचा ई-मेल उघडता येत नाही. त्यामुळे मग आपला ई-मेल हॅक झाला असावा, अशी शंका त्यांना येते.


माझा ई-मेल हॅक झाला असावा! अशी खात्री झाली असली तरी खाली दिलेल्या काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे.

१ आपला ई-मेल हॅक कोण आणि कशासाठी करेल?

२ आपला ई-मेल करून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा काय फायदा होईल, जास्तीत जास्त तो आपल्या नावाने कुणालातरी खोटे पत्र पाठवेल. पण नंतर त्याचा खुलासा होईलच. प्रत्यक्षात इंटरनेटवर दुसऱ्याच्या नावाने तिसऱ्याला ई-मेल पाठवण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. (त्यांची इथे माहिती देता येणार नाही, नाहीतर तुम्हीच कुणालातरी दुसर्?याच्या नावाने खोटा ई-मेल पाठवाल.

ई-मेल हॅक करणे सोप्पी गोष्ट नाही, तसेच ज्याला ई-मेल हॅक करता येतो तशी व्यक्ती खरंच आपल्या आसपास आहे का हे पहावे.
आपला ई-मेल चालत नाही म्हणजे तो नक्कीच हॅक झाला असावा याची शक्यता लाखो ई-मेल मध्ये एक एवढी आहे. त्यामूळे आपला ई-मेल चालत नसल्यास यापैकी कुठला पर्याय त्याला लागू होतो ते पाहावं.

आपला पासवर्ड कसा असावा?

महाराष्ट्र टाईम्स Link - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4437343.cms

आपला पासवर्ड काय असावा हे ज्याने त्याने आपल्या आवडीनुसार ठरवावे.
प्रत्येकाला आपला पासवर्ड योग्य आहे आणि शक्यतो तो कुणाला कळणार नाही असंच वाटतं. परंतू आपला पासवर्ड योग्य आहे आणि तो कुणाला कळणार नाही असा गैरसमज कधीच करून घेऊ नये. थोडावेळ जर तुम्ही तुमच्याच पासवर्डचा विचार केल्यास आपणास कळेल की तो किती सोपा आहे, कारण आपला पासवर्ड म्हणून आपण शक्यतो कुणाचं ना कुणाचं नाव दिलेलं असतं.
* सर्वसाधारणपणे एखादं नाव पासवर्ड म्हणून वापरलं जातं. निदान आठ टक्के पासवर्ड तरी कुणाच्या ना कुणाच्या नावाचे असतात.

* असं कधीही गृहीत धरूनये की आपला पासवर्ड कधीच कुणी शोधू शकणार नाही. आपण जर आपला पासवर्ड म्हणून एखादं नाव वापरलं असेल तर तुमचा पासवर्ड तुमच्यासोबत काम करणारी अथवा जवळची व्यक्तीपटकन तुमचा पासवर्ड शोधून दाखवेल.
* याचा अर्थ आपला पासवर्ड म्हणून निरनिराळी अक्षरं आणि अंक तसंच सांकेतिक चिन्ह असलेला असावा असा होत नाही. आपला पासवर्ड म्हणून एखादं नाव देण्यामागचा अर्थच असा असतो की तो लगेच लक्षात राहावा. परंतू जर एखाद्याचं नाव जर पासवर्ड नसावा तर मग लक्षात राहील, असा पासवर्ड निवडावा तरी कसा? असा प्रश्न निर्माण होतो.
* चांगला पासवर्ड असा द्यावा : निरनिराळी अक्षरं आणि अंक तसंच सांकेतिक चिन्ह वापरून किचकट पासवर्ड निवडण्याएवजी आपणास हवे असलेलं एखादं नावच पासवर्ड म्हणून वापरावे, परंतू त्याच नावामधे $ किंवा # चिन्ह वापरावं. उदा. जर तुमचा पासवर्ड sachin असल्यास sac#in किंवा sachin$ असा पासवर्ड द्यावा. अशाप्रकारे आपला पासवर्ड सोपा आणि सहजासहजी कुणाला न कळण्यासारखा होतो.
* शक्यतो आपला पासवर्ड आठ अंकी असावा, कारण सध्या जवळजवळ सर्वच ठिकाणी किमान आठ अंकी असावा लागतो, म्हणून ऐनवेळी काय पासवर्ड द्यावा हे ठरवण्यापेक्ष्या आपला पासवर्ड आठ अंकी तसेच त्यामध्ये $ किंवा # चिन्ह असलेला असावा.

जगातून कुठूनही चालवा आपला कम्प्युटर!

महाराष्ट्र टाईम्स Link - http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/4273479.cms

सध्या आपला कम्प्युटर आपली अतिमहत्त्वाची वस्तू बनलेली आहे. जणू काही आपला जिवलग मित्रच. तर कधीकधी आपले त्याहूनही अगदी जवळचं नातं तयार झालेलं असतं. बऱ्याच वेळा असं होतं, की आपली सर्व महत्त्वाची कामं ऑॅफिसच्या कम्प्युटरवर करत असतो. घरी आल्यावर किंवा एखाद्या वेळी बाहेरगावी गेल्यावर ऑॅफिसमधल्या कम्प्युटरवरची महत्त्वाची फाइल हवी असते मग ती फाइल कशी मिळवायची, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो.



या समस्येवर एक चांगला आणि सोपा पर्याय आहे तो म्हणजे 'रिमोट कम्प्युटर ऍक्सेस'. सध्या आपण कुठूनही आपला कम्प्युटर चालवणं अगदी सहज शक्य आहे. 'रिमोट कम्प्युटर अॅक्सेस'द्वारे आपण इण्टरनेटच्या माध्यमातून कोणत्याही कंपनीला आणि काहीही पैसे न देता आपण कधीही आणि कितीही वेळा आपला कम्प्युटर हाताळू शकता.


सध्या काही मोजक्याच कंपन्यांच्या प्रोग्रॅमद्वारे ही सिस्टम वापरता येते.यामधे काही कंपन्यांचा प्रोग्रॅम काही हजार रुपयांना विकत घ्यावा लागतो. तर काही अगदी मोजक्या कंपन्या त्याचा रिमोट कम्प्युटर अॅक्सेस प्रोग्रॅम अगदी मोफत देतात. ही सेवा मोफत देणाऱ्या कंपन्यांमधे 'लॉगमीइन' ही कंपनी फार प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या www.logmein.com वेबसाइटद्वारे आपण ही सेवा वापरू शकता.

या वेबसाइटवरून एक छोटासा प्रोग्रॅम आपल्या कम्प्युटरमधे लोड करावा लागेल. त्यानंतर आपण तो कम्प्युटर कुठूनही अॅक्सेस करू शकता. फक्त अशा वेळी दोन्ही कम्प्युटर चालू असणं आवश्यक आहे. तसंच दोन्ही कम्प्युटरवर इण्टरनेट सुरू असणं आवश्यक आहे.


नवीन खातं उघडण्यासाठी या वेबसाइटवर नवं मेल सुरू करण्याची जी प्रक्रिया असते तशाच प्रकारचा फॉर्म भरवा लागतो. आता जेव्हा आपल्याला एखादा कम्प्युटर दुसरीकडून अॅक्सेस करायचा असेल तर आपल्या खात्यामधे जमा केलेले कम्प्युटर हाताळू शकता फक्त ते सुरू असणं आणि त्यावर इण्टरनेट सुरू असणं आवश्यक आहे. आता जर आपल्याला आपल्या खात्यामधे जमा केलेला एखादा कम्प्युटर चालवायचा असेल, तेव्हा परत www.logmein.com ही वेबसाइट सुरू करा. आता आपण या वेबसाइटचे मोफत सभासद असल्याने आपल्या खात्याच्या ई-मेल आयडी आणि पासवर्डने लॉगइन करा. आता आपल्यासमोर My Computers चं पान उघडेल त्यातील जे जे कम्प्युटर्स चालू असतील त्यांची नावं ठळक दिसतील, तर बंद असलेल्या कम्प्युटर्सच्या पुढे Offline असं दिलं असेल. आता जोकम्प्युटर आपल्याला उघडायचा असेल त्याच्या नावावर क्लिक करा. आता लगेचच त्या कम्प्युटरचा Access Code म्हणजेच त्याला दिलेला पासवर्ड विचारेल तो देऊन लॉगइन या बटणावर क्लिक करताच आपल्यासमोर तो कम्प्युटर हाताळण्याचं पान उघडेल त्यातील Remote Control या बटणावर क्लिक करा. आता तो दुसरीकडील कम्प्युटर जसाच्या तसा आपल्यासमोर छोट्या स्क्रीनमधे उघडेल इथे फुल स्क्रीनच्या ऑॅप्शनवर क्लिक करून तो कम्प्युटर उघडू शकता काम पूर्ण होईल तेव्हा Disconnect या बटणावर क्लिक करा. आपण ज्या कम्प्युटरला हाताळत असाल, त्यावर जणू काही जादू झाल्याप्रमाणे सर्व गोष्टी आपोआप होताना दिसतील.