कामाच्या भल्यामोठ्या फाइल ई-मेलवरून कशा पाठवयाच्या असा प्रश्न पडलाय... तर त्यावर उपायही आहे.
.....................
टेलिफोन लाइनमधून इंटरनेट, मग केबलमधून, नंतर ब्रॉडबँड केबलमधून असा प्रवास करत यूएसबी मोडेम या केबलरहित म्हणजेच वायरलेस इंटरनेट वापरात आलं आहे. इंटरनेटची केबल वायरलेस मोडेमला जोडली की त्याच्या जवळच्या काही परिसरामध्ये आपण कम्प्युटरमधील वाय-फाय प्रणालीच्या मदतीने इंटरनेट वापरू शकतो. परंतु यामध्ये त्या वायरलेस मोडेमच्या जवळपासच्या कम्प्युटरवरच चांगल्या प्रकारे इंटरनेट चालतं. म्हणून मग प्रवासामध्ये अथवा बाहेरगावी असताना इंटरनेटमुळे थांबणारी कामं यूएसबी मोडेमच्या मदतीने पूर्ण होऊ लागली.
इंटरनेटचा वेग आता वाढलाय. साधारण दहा वर्षापूवीर् इंटरनेटचा वेग हा जेमतेमच होता साधारण ८-१६ केबी/पीएस म्हणजेच ८ ते १६ किलो बाइट साइज एका सेकंदाला. तर सध्या इंटरनेटचा वेग आता एका सेकंदाला मेगाबाइटवरून गिगाबाइटच्या दिशेने चालला आहे. म्हणजेच मोठ्या आकाराची फाइल आपण काही सेकंदात इ-मेलने पाठवू शकतो.










